पहाडी बैल

जातिवंत पहाडी बैलांसाठी प्रसिद्ध बैल बाजार

जातिवंत बैल, गाय, म्हैस जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथील बैल बाजाराला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे. हा एक फेमस बैल बाजार आहे. येथे दररोज हजारोंच्या संख्येने पशुपालक शेतकरी बांधव बैलांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी दाखल होत असतात. या बाजाराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे मध्य प्रदेश मधील पहाडी बैल देखील या बाजारात विक्रीसाठी येतात. चांदूरबाजार तालुक्याच्या सीमा मध्यप्रदेशला लागून आहेत, त्यामुळे येथे मध्य प्रदेश मधील पहाडी बैल देखील विक्रीसाठी येतात. त्यामुळे जर तुम्हाला पहाडी बैल खरेदी करायचा असेल तर तुम्ही एकदा चांदुर बाजार बैल बाजाराला हजेरी लावली पाहिजे. येथे दर रविवारी बैल बाजार भरतो. या बाजाराची वार्षिक उलाढाल 160 ते 187 कोटी रुपये एवढी आहे.

चांदूरबाजार एपीएमसी ची स्थापना 1974 मध्ये झाली. यानंतर या बाजारात अवघ्या काही वर्षांच्या काळात बैल बाजार भरायला सुरुवात झाली. या बाजारात गाईंच्या अनेक जाती विक्रीसाठी उपलब्ध असतात. लाल कंधारी, एचएफ, मुरा, गावठी, जर्सी, काठीयावाडी, गुजर इत्यादी गाईंच्या जाती या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असतात. अन्य गावरान गाई-म्हशींच्या जाती देखील या बाजारात विक्रीसाठी येतात. या बाजारात गावरान तसेच मध्य प्रदेश मध्ये आढळणारे नागोर बैल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. मध्यप्रदेश मधील छिंदवाडा आणि भंडारा येथील गावठी आणि नागोर जातीच्या बैलांना या बाजारात मोठी मागणी असते.