असे काढा ऑनलाईन लायसन्स

  1. सर्वात आधी परिवहन विभागाच्या वेबसाईटवर जा
  2. त्यानंतर Online Services मध्ये जा आणि Driving Licence Related Services वर क्लिक करा
  3. तुम्ही ज्या राज्यात राहताय ते राज्य सिलेक्ट करा
  4. यानंतर ‘Learner’s Licence Application’ वर क्लिक करा
  5. त्यानंतर तेथे लिहिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि नंतर तिथे तुमचे वैयक्तिक डिटेल्स भरा
  6. त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर विचारला जाईल.
  7. learner’s licence अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि तिथे मागितलेले दस्तऐवज अपलोड करा
  8. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग टेस्टची तारीख निवडा आणि पेमेंट प्रोसेस करा.

 

लर्निंग लायसन्सचा अर्ज तुमच्या राज्यात पूर्णपणे ऑनलाइन असेल तर तुम्हाला आधार ऑथेन्टिकेशन हा पर्याय निवडावा लागेल. लर्निंग लायसन्ससाठी तुम्हाला आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रात लर्निंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही. तसेच दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये देखील ही प्रक्रिया ऑनलाईन पार पाडता येते.