ओव्हरड्राफ्ट सुविधा हा कर्जाचा एक प्रकार आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या बँक खात्यातून चालू शिल्लक रकमेपेक्षा जास्त पैसे काढता येतील. यामध्ये काढलेली रक्कम ठराविक कालावधीत परत करावी लागते आणि त्यावर व्याजही आकारले जाते. जन धन खात्यात ओव्हरड्राफ्ट सुविधा देखील उपलब्ध आहे. या अंतर्गत, बॅलन्स नसतानाही खात्यातून 10,000 रुपये काढता येतात. ही रक्कम एटीएम किंवा यूपीआयद्वारे सहज काढता येते.