केळी घरी आणल्यानंतर त्यात ‘या’ पध्दतीने पेन टाकून पाहा; पाहून थक्क व्हाल

Banana Jugaad Video : सोशल मीडियावर कायमच अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल प्लॅटफॉर्म व्हायरल व्हिडिओचा खजिना आहे हे म्हणणे वावगे ठरणार नाही. कधी लोकांचे अनोखे जुगाड पाहायला मिळतात. तर कधी लोकांना आश्चर्यचकित करणारे व्हिडिओ पाहायला मिळतात. व्हायरल होत असलेल्या या महिलेच्या व्हायरल व्हिडिओने आता अनोखा जुगाड दाखवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. गृहिणींकडे काही ना काही घरगुती जुगाड असतात. अशाच एका गृहिणीने हा जुगाड दाखवला आहे. तिने आपल्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

👉 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 👈

 

महिलेने केळी आणि पेनाचा भन्नाट असा जुगाड शेअर केला आहे. पेन आणि केळी याचा काय जुगाड असेल, हे वाचून तुम्हीही विचारात पडले असाल ना. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक हटके ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकच्या मदतीने केळी खराब होणार नाहीत, केळी जास्त काळ ताजी ठेवण्याची युक्ती महिलेने सांगितली आहे. केळी हे असे फळ आहे जे दीर्घकाळ टिकू शकत नाही. फळे चांगली राहण्यासाठी ती फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र, केळी फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत. अशात ती बाहेर ठेवल्यास काळी पडून खराब होतात. केळी लवकर खराब होऊ नये, यासाठी हा प्रयोग नक्की करुन पाहा, असे महिलेचे म्हणणे आहे.

 

👉 येथे क्लिक करून व्हिडीओ पहा 👈

 

तुम्हाला नेमकं काय करायचं?

महिलेने व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, केळ्यांचा एक घड घ्यायचा आहे. त्यानंतर एक पेन घेऊन त्याला एक दोरी बांधायची आहे. दोरी पेनाच्या मधोमध बांधायची आहे. मग ही दोरी केळ्यांच्या घडाच्या मध्यभागातून दुसऱ्या बाजुने बाहेर काढायची आहे. दोरीला असलेला पेन केळाच्या घडाला अडकेल आणि दोरी व्यवस्थितपणे अडकली जाईल. त्यामुळे तुम्ही केळीचा घड कुठेही लटकवून ठेवू शकता. यामुळे तुमच्या केळी खराब होणार नाही, केळी कुठेही खाली ठेवल्याने त्यावर दाब पडल्याने वरच्या केळींमुळे खाली असलेल्या केळी खराब होऊ शकतात. त्यामुळे केळी खाली ठेवण्याऐवजी पेन आणि दोरीच्या साहाय्याने लटकवून ठेवल्याने, दाब त्यावर पडणार नाही. त्यामुळे तुमच्या केळी खराब होणार नाही, असे महिलेचे म्हणणे आहे. Priti Rasoi या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा जुगाड तुम्हीही नक्की ट्राय करुन पाहा आणि खरंच याचा फायदा तुम्हाला झाला का, हे आम्हाला कमेंट करुन कळवा.

Leave a Comment