दे दणादण! लग्नसमारंभात तुफान राडा, एकमेकांना फेकून मारल्या खुर्च्या; पाहा Video

Bride Groom Family Fight : लग्नात मानापमान, रुसवे-फुगवे होतच असतात. दोन्ही पाहुणे मंडळींकडून काही वेळा चूक होते किंवा कोणाचा मान द्यायचा राहून जातो. पण, या रुसव्याफुगव्यांना बाजूला ठेवत लग्नसमारंभ आनंदात पार पडतो. पण, गेल्या काही काळापासून लग्नसमारंभात काही क्षुल्लक गोष्टींवरून मारहाणीच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात तुफान राडा झाला आहे. यावेळी वधू अन् वर दोन्ही पक्षांतील लोक भांडत होते. हे भांडण शेवटी इतके टोकाला पोहचले की, पाहुणे मंडळी एकमेकांवर खुर्च्या फेकू लागले.

 

👉 येथे क्लिक करून व्हिडिओ पहा 👈

 

लखनऊमधील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. अन्य लग्न समारंभाप्रमाणे येथेदेखील सर्व काही छान सुरू होते. नवरी नवऱ्याने एकमेकांना हार घातले, फेरेदेखील घेतले, त्यानंतर सर्व जण जेवणाकडे वळले, यावेळी हॉलमध्ये रिसेप्शन सोहळा सुरू होता. पण, जेवणाच्या ठिकाणी काही कारणावरून दोन गटांत जोरदार भांडण झाले. हे भांडण केवळ शाब्दिक नाही, तर थेट हाणामारीपर्यंत गेले, ज्यात काही जण जखमी झाल्याचीदेखील शक्यता आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, लग्नसमारंभाच्या ठिकाणी पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था केली, तिथे काही जण भांडत आहेत. यावेळी भांडण इतके विकोपाला पोहोचले की, दोन्ही बाजूच्या लोकांनी तिथल्या खुर्च्या उचलून एकमेकांना मारहाणी केली.

 

👉 येथे क्लिक करून व्हिडिओ पहा 👈

 

इतकेच नाही तर खुर्च्या फेकूनदेखील मारल्या. यावेळी काहींनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्नदेखील केला, मात्र मारामारी करणारे कोणाच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. ही घटना लखनऊच्या अमिनाबाद भागात असलेल्या बुद्धलाल धर्मशाळेत घडली असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अमिनाबाद पोलिसांनी दोन्ही पक्षांवर कारवाई केली आहे, अशी माहिती आहे. लग्नसमारंभासाठी आलेल्या पाहुण्यांना जेवण कमी पडल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ @SabirSh48723440 नावाच्या एक्स अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट करून त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिले की, ‘लग्नात असे कोण भांडते भाऊ?’, तर दुसऱ्याने लिहिले की, ‘वराने सर्वांना थोडीशीच प्या असे सांगितले होते, पण ते मित्राच्या लग्नाला आलेत, मग कंट्रोल कसे करणार? अशाप्रकारे अनेक जण भन्नाट, मजेशीर मतं व्यक्त करत आहेत.

Leave a Comment