थंड पाणी टाकताच मिळतं गरम पाणी, गावकऱ्यांच्या या जुगाडसमोर इस्रोवाले सुद्धा होतील फेल

Chulha Desi Jugad : भारतीय लोकं जुगाड करण्याच्या बाबतीत अव्वल आहेत. आपण असे असे जुगाड शोधून काढतो ज्याबद्दल विदेशी माणसं स्वप्नातही विचार करू शकत नाही. असाच एक अवाक् करणारा जुगाड सध्या चर्चेत आहे. गावकऱ्यांनी अशी एक चूल तयार केलीये ज्यावर एकाच वेळी तुम्ही दोन कामं करू शकता. भाकरी भाजता भाजता त्याच आगीवर पाणी सुद्धा गरम करू शकता. बरं, जुगाड करताना असं डोकं लावलंय की, पाणी गरम करण्यासाठी तुम्हाला चुलीवरचं पहिलं भांडं बाजूला ठेवण्याची गरज नाही. चला तर मग पाहूया गावकऱ्यांनी इंधन बचाव चूल तयार केली तरी कशी?

गावकऱ्यांनी कसा केला जुगाड

सर्वात आधी पत्र्याचा डबा घेतला. या डब्याला कापून त्याला दोन नळकांडी बसवली. यातील पहिलं नळकांडं पाणी ओतण्यासाठी वापरलं जातंय तर दुसरं गरम झालेलं पाणी बाहेर निघण्यासाठी. या डब्याच्या मधोमध लाकडं सारण्यासाठी जागा आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता या चुलीवर भाकरी आणि पाणी एकाच वेळी गरम केलं जातंय. हा जुगाडू व्हिडीओ @Babymishra_ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा जुगाड ९६ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या चूलीचं कौतुक केलंय. कारण ही चूल अशी आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही कमीत कमी लाकडं जाळून जास्तीत जास्त आग निर्माण करू शकता.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

Leave a Comment