तवा गरम करून त्यावर ठेवा आंघोळीचा साबण, होईल जादुई परिणाम

Kitchen Soap Jugad : अंघोळीचा साबण आपण अंघोळीसाठीच वापरतो पण या साबणाचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. अंघोळीचा साबण गरम तव्यावर ठेवताच कमाल झाली आहे. याचा परिणाम असा की पाहूनच तुम्ही चकीत व्हाल.या जबरदस्त अशा किचन जुगाडा चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसं तवा आणि साबण यांचा संबंध काही नवा नाही.म्हणजे भांडी घासण्यासाठी वापरला जाणारा साबण ज्याने तुम्ही तवा घासला असला.पण तव्यावर अंघोळीच्या साबणाची एक वेगळीच कमाल आहे. हा परिणाम कोणत्या जादूपेक्षा कमी नाही.आता नेमकं काय आणि कसं ते पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल.चला तर मग पाहुयात.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

महिलेने व्हिडीओत दाखवल्यानुसार तुम्हाला सर्वात आधी तवा गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचा आहे. गॅस चालू असतानाच तव्यात अंघोळीचा साबण किसून टाकायचा आहे. यात पाणी ओतायचं आहे. मग यात बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आणि व्हिनेगर टाकायचं आहे.व्हिनेगरऐवजी तुम्ही लिंबाचा रसही वापरू शकता. आता हे मिश्रण पाच मिनिटं उकळायचं आहे आणि ढवळत राहायतं आहे. मिश्रण ढवळण्यासाठी शक्यतो लाकडाचा चमचा वापरा जेणेकरून तुमचा तवा खराब होणार नाही. जर स्टिलचा चमचा वापरत असाल तर हलक्या हाताने ढवळा. हळूहळू मिश्रण आटत जातं. तव्यावर ते नीट पसरलेलं असतं आता हा तवा नीट स्वच्छ धुवून घ्या. शेवटी तुम्ही परिणाम पाहा. अंघोळीचा साबण लावण्याआधीचा तवा आणि अंघोळीचा साबण लावल्यानंतरचा तवा यात बराच फरक दिसतो आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; इथे क्लिक करा 👈

 

तुम्ही पाहिलं असेल रोजच्या वापरानंतर तवे किंवा नॉनस्टीक काळपट होतात.त्याच्या कडेने एक जाडसर काळा थर जमा होतो. हा थर पदार्थामार्फत आपल्या पोटात जाण्याची शक्यता असेत. यामुळे आपण आजारी पडण्याचा धोका असतो. पण अंघोळीचा साबण त्यावर लावल्याने हा काळपटपणा सहज निघाला. तुम्हाला तो चमच्यावरही दिसून येईल. महिलेने सांगितल्यानुसार जर तुमच्या तव्यावरील काळा थर खूप जुना असेल तर एकदाच हा उपाय करून लगेच परिणाम दिसणार नाही.दोन-तीन वेळा ही प्रक्रिया करावी लागेल. simply marathi युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही हा उपाय करून पाहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा

Leave a Comment