‘ही’ कंपनी घेऊन येत आहे 6000mAh ची दमदार बॅटरी असलेला फोन; पुढील आठवड्यात होईल लाँच, किंमत फक्त एवढी

मोटोरोलानं आपल्या जी सीरीज स्मार्टफोन Moto G24 Power ची लाँच डेट सांगितली आहे. हा नवीन मोबाइल येत्या ३० जानेवारीला भारतीय बाजारात सादर होईल. डिवाइस बद्दल कंपनीनं सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर माहिती शेयर केली आहे. यात 6000mAh ची बॅटरी, ५०एमपी कॅमेरा, ६.६ इंचाचा मोठा डिस्प्ले, ८जीबी पर्यंत रॅम असे अनेक स्पेसिफिकेशन्स मिळतील. चला, जाणून घेऊया मोटो जी२४ पावरची संपूर्ण माहिती. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर कंपनीनं नवीन टीजर व्हिडीओ शेयर केला आहे ज्यात Moto G24 Power फोनचे फीचर्स आणि डिजाइन दाखवण्यात आली आहे. त्यानुसार डिवाइस ३० जानेवारीला लाँच केला जाईल. हा मोबाइल फ्लिपकार्ट, motorola.in आणि अन्य रिटेल स्टोर्सवर सेलसाठी उपलब्ध होईल. तसेच फ्लिपकार्टवर मोबाइलची मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे. जिथे सर्व स्पेसिफिकेशन लिस्ट करण्यात आले आहेत.

 

👉 मोबाईलचे फोटो पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

Moto G24 Power चे स्पेसिफिकेशन्स

फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार Moto G24 Power ६.६ इंचाच्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल. या स्क्रीनवर पंच होल कट आउट डिजाइन मिळेल. मोटोरोलाचा G24 Power मोबाइल लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर आधारित असेल. पावर बॅकअपसाठी Moto G24 Power मध्ये ६०००एमएएचची बॅटरी आणि ३३वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला जाईल. फोनमध्ये परफॉर्मन्ससाठी कंपनी ऑक्टा कोर हेलिओ जी८५ चिपसेट देत आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी माली जी५२ एमपी२ जीपीयू मिळेल. दोन स्टोरेज ऑप्शन दिले जातील, ज्यात ४जीबी आणि ८जीबी रॅमसह १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल.

 

👉 मोबाईलचे फोटो पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

फोटोग्राफी

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह दिला जाईल. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी आणि २ मेगापिक्सलचा दुसरी लेन्स असेल. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी मोबाइलमध्ये ड्युअल सिम ४जी, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट, ३.५मिमी हेडफोन जॅक, एफएम रेडियो सारखे ऑप्शन मिळतील. यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक फीचर, पाणी आणि धुळीपासून वाचण्यासाठी फोनमध्ये आयपी५२ रेटिंग आणि चांगल्या ऑडियोसाठी स्टीरियो स्पिकरसह डॉल्बी अ‍ॅटमॉसचा सपोर्ट दिला जाईल.

Leave a Comment