१४ लाख दिव्यांपासून साकारली श्रीरामाची प्रतिमा, व्हिडीओची सगळीकडे चर्चा; पाहा व्हायरल व्हिडीओ

Ram Mandir Viral Video : आज २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या निमित्त्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. संपूर्ण देश दिवाळी साजरी करताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दिवे लावून उत्सव साजरा केला जात आहे.अशातच अयोध्येतील एका महाविद्यालयात चक्क दिव्यांपासून श्रीरामाची प्रतिमा साकारली आहे. या प्रतिमेसाठी १४ लाख दिव्यांचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

हा व्हायरल व्हिडीओ अयोध्येतील एका महाविद्यालयातील आहे. मोठ्या मैदानावर काही स्त्रिया दिवे लावताना दिसत आहे. योग्य पद्धतीने आणि क्रमवार दिवे लावताना त्या दिसत आहे. असंख्य दिव्यांच्या मदतीने ते प्रभू श्रीरामाची प्रतिमा साकारताना दिसत आहे. सुरुवातीला व्हिडीओत तुम्हाला प्रभू रामाची प्रतिमा दिसणार नाहीत पण नंतर सुंदर रामाची प्रतिमा साकारलेली दिसते. या श्रीरामाच्या प्रतिमेमध्ये अनेक रंगाचे दिवे वापरले आहेत. श्रीरामाचे शरीर निळ्या रंगाचे दाखवण्यासाठी निळा रंगाचे दिवे, त्यांच्या वस्त्रांसाठी गुलाबी आणि पिवळा रंगाचे दिवे वापरले आहे. याशिवाय त्यांच्या पायाखाली दिव्यांपासून काम मंदिर सुद्धा साकारले आहे. आणि खाली ‘जय श्री राम’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेय.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

 

या प्रतिमेत श्रीराम धनुष्यबाण चालवताना दिसताहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साकेत महाविद्यालय अयोध्या. १४ लाख दिव्यांपासून बनवली प्रभू श्रीरामाची प्रतिमा” ayodhyase या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर, जय श्री राम” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही एक सुंदर कला आहे” अनेक युजर्सनी व्हिडीओवर ‘जय श्री राम’चा जयघोष केला आहे. काही युजर्सनी व्हिडीओवर हार्टेचे इमोजी शेअर केले आहे.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा 👈

Leave a Comment