शेतात माणसांप्रमाणे काम करतोय रोबोट, तुफान स्पीडनं कापतोय पीक, व्हिडिओ पहा

Robot Farming Viral Video : तंत्रज्ञान आणि नवनव्या टेक्निक माणसांचं काम सोपं करत आहेत. त्यामुळे आजकाल प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक कामात नवीन आणि हटके तंत्रज्ञान दिसून येतं. यातीलच मानवनं बनवलेलं एक खास तंत्रज्ञान म्हणजे रोबोट. आजकाल रोबोट माणसांना रिप्लेस करुन त्यांची कामं करताना दिसून येतात. असाच आणखी एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये रोबोट चक्क शेतातील काम करताना दिसतोय.

 

येथे क्लिक करा

 

तुम्ही आत्तापर्यंत अनेक रोबोट पाहिले असतील. त्यांना काम करतानाही तुम्ही पाहिलं असेल. मात्र कधी तुम्ही कोणत्या रोबोटला शेतातील काम करताना पाहिलंय का? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक रोबोट चक्क शेतात काम करताना दिसतोय. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक रोबोट शेतात काम करतोय. तो वेगानं शेतातील पीक कापत आहे. हे दृश्य पाहून माणसांचं शेतातील काम सोपं होईल हे नक्की. अनेकांनी दावा केलाय की, हा व्हिडीओ AI च्या मदतीनं तयार केलेला आहे.

 

येथे क्लिक करा

 

Farming database नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. काहीच वेळात व्हिडीओ वेगानं व्हायरल झाला. व्हिडीओवर भरपूर कमेंटही पहायला मिळत आहे. अनेकांनी याला भविष्यात फायद्याचं म्हटलं आहे तर काहींनी म्हटलं, हे भविष्यात घातकही ठरु शकतं. दरम्याम, आजकाल AI च्या मदतीनं तयार केलेले अनेक फोटो, व्हिडीओ समोर येत असतात. यामध्ये लोक ज्या गोष्टी करु शकतो, किंवा भविष्यात आणि भूतकाळाच्या काही गोष्टीमच्या आधारे काहीतरी क्रिएटिव्ह करत असतात.

Leave a Comment