महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ निवड यादी जाहीर, इथे बघा यादी

नमस्कार मित्रांनो बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्या उमेदवारांना पाहता येणार आहे. तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात

प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यात आले आहे. निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे. पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे संबंधित यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य समन्वयक, तलाठी परीक्षा तथा प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त सरिता नरके यां दिली. निवड प्रतीक्षा यादीनं उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र संबंधित कागदपत्रे यांची पडताळ वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळ तसेच समांतर आरक्षणाप्रम कागदपत्रांची पडताळणी ही नियुक् पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा नि समितीमार्फत केली जाणार अ तलाठी भरती परीक्षेसाठी राज्याती साडेअकरा लाखांपेक्षा जा उमेदवारांनी अर्ज भरले हो छाननीनंतर ४ हजार ४६६ जागांसा १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अ प्राप्त झाले होते.

Leave a Comment