शाळकरी मुलींनी सादर केला सुंदर जोगवा डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Girl Dance Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण आवडीने डान्स सादर करत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही विद्यार्थीनीनी सुंदर डान्स करताना दिसत आहे. शाळेत अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सांस्कृतिक कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रकारचे डान्स विद्यार्थी सादर करतात. अशातच एका शाळेतील काही विद्यार्थीनींचा हा डान्स व्हिडीओ चर्चेत आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की या शाळकरी मुलींनी सुंदर जोगवा डान्स सादर केला आहे. हा डान्स सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्हीही हा डान्स पाहून थक्क व्हाल.

 

व्हायरल व्हिडीओ ; येथे क्क्लिक करून पहा

 

हा व्हायरल व्हिडीओ एका शाळेच्या मैदानावरील आहे. तिथे अनेक विद्यार्थी बसलेले दिसत आहे आणि त्यांच्यासमोर काही विद्यार्थीनी लाल आणि हिरव्या रंगाची नऊवारी नेसून सुंदर जोगवा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. त्यांची वेषभूषा आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही हरवून जाल. त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून तुमच्याही शरीरात ऊर्जा निर्माण होईल. त्या खूप सुंदर डान्स करताना दिसत आहे. ‘नदीच्या पल्याड आईचा डोंगुर’ या लोकप्रिय गाण्यावर या विद्यार्थीनी सुरेख डान्स करताना दिसत आहे. महाराष्ट्रातील हा एक लोकप्रिय नृ्त्यप्रकार आहे. विशेष करून देवीचे भक्त हे जोगवा नृत्य सादर करतात. या चिमुकल्या विद्यार्थीनीनी ज्या पद्धतीने डान्स केला आहे ते पाहून तुम्हीही अचंबित व्हाल.

 

व्हायरल व्हिडीओ ; येथे क्क्लिक करून पहा

 

nishii.tiwari या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम” तर एका युजरने लिहिलेय, “आतापर्यंत या गाण्यावर बघितलेला सर्वात कडक डान्स” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे गाणं ऐकलं की अंगावर शहारा येतो” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आणि या विद्यार्थीनीनीचा डान्स आवडला आहे. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Leave a Comment