भर मंडपात नवरीच्या मागे लागला कुत्रा; लग्न अर्ध्यातच सोडून पळाली नवरी; VIDEO व्हायरल

Wedding Funny Video : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. आता देखील सोशल एका लग्नसमारंभातील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओपाहून सर्वचजण चकित झालेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नमंडपात नवरीच्या मागे एक कुत्रा लागला आहे.

नवरी पुढे पळतेय आणि कुत्रा तिच्या मागे मागे पळत आहे. नवरीने घागरा घातला असल्याने तिला व्यवस्थित पळता देखील येत नाही. मंडपात पुजेचं सामान ठेवलेलं आहे. त्यातुनच हे दोघे पळत आहेत. अशात पुजेसाठी ठेवलाल कलश आणि कुरमुऱ्यांचे ताट खाली पडते. मंडपात सगळीकडे हे कुरमुरे आणि तांदुळ पसरले जातात. नवरीला कुत्र्यापासून दूर करण्यासाठी सर्वजण धावपळ करतात. मात्र कुत्रा काही ऐकायला तयार नाही. शेवटी नवरदेव पुढे येतो आणि आपल्या पत्नीला कुत्र्यापासून वाचवतो. त्यानंतर कुत्रा तेथून निघून जातो.

 

👉 व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment